आशियाई गेम्स: पाकिस्तानला हरवून हिंदुस्थानच्या हॉकी संघाने जिंकले कांस्य पदक

10

सामना ऑनलाईन । जकार्ता 

हिंदुस्थानच्या हॉकी संघाने शनिवारी पाकिस्तानला २-१ ने हरवून कास्यं पदक जिंकले आहे. आकाशदीप सिंह आणि हरमनप्रीत सिंह यांनी दमदार गोल केले आणि हिंदुस्थानचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात अखेरचा सामन रंगेल अशी सर्वांची अपेक्षा होती पण उपांत्य सामन्यात हिंदुस्थानला मलेशियाकडून आणि पाकिस्तानला जपानकडून हार पत्करावी लागली त्यामुळे कांस्य पदकासाठी हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी समोर आले.

हिंदुस्थानी टीमसाठी आकाशदीप सिंह ने तिसर्‍या आणि हरमनप्रीतने ५० व्या मिनिटाला गोल केला, तर पाकिस्तानच्या टीमसाठी मोहम्मद अतीकने ५२ व्या मिनिटाला एकमेव गोल केला.

तर दुसरीकडे आशियाई खेळात १३ व्या दिवशी हिंदुस्थानी महिला हॉकी टीमला अंतिम सामन्यात जपानविरोधात १-२ फरकाने हरली. त्यामुळे महिला हॉकीपटू टीमने रौप्य पदकाची कमाई केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या