अमेरिकी सैनिकांनी सादर केले हिंदुस्थानचे राष्ट्रगीत, तुम्ही व्हिडीओ पाहिलात

1044

अमेरिकेच्या सैनिकांनी खास हिंदुस्थानी सैनिकांसाठी ‘जन गण मन’ची धून वाजवली आहे. याचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत असून, अमेरिकेच्या सैनिकांचे यासाठी कौतुक केले जात आहे. हिंदुस्थानी आणि अमेरिकन सैनिकांनी नुकताच संयुक्त युद्ध अभ्यास केला. वॉशिंग्टन शहरात लुईस मॅककॉर्ड तळावर हा संयुक्त यु्द्ध सराव करण्यात आला होता. बुधवारी या युद्ध अभ्यासाचा समारोप होता. यावेळचा हा व्हिडीओ आहे.

गेल्या आठवड्यातील शुक्रवारपासून या संयुक्त युद्ध अभ्यासास सुरुवात झाली होती. दोन्ही देशातील करारानुसार या युद्ध सरावाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दोन्ही देशातील लष्करी अधिकाऱ्यांमध्ये युद्ध शैली, प्रतिकूल परिस्थितीचा सामना कसा करावा याबाबतच्या विचारांची देवाणघेवाण केली. याच अभ्यासादरम्यान काही दिवसांपूर्वी ‘बदलूराम का बदन’ या गाण्यावर दोन्ही देशाच्या सैनिकांनी ठेका धरल्याचाही व्हिडीओ व्हायरल झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या