राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळ्याचे काय होणार?

422

महान हॉकीपटू ध्यानचंद यांचा जन्मदिवस म्हणजेच 29 ऑगस्ट हा दिवस हिंदुस्थानात राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी देशातील सर्वोच्च समजले जाणारे पुरस्कार खेळाडूंना प्रदान केले जातात. राजीव गांधी खेलरत्न, अर्जुन, द्रोणाचार्य व ध्यानचंद या पुरस्कारांचे वितरण याच दिवशी राष्ट्रपती भवनात केले जाते. पण यंदा कोरोनामुळे या पुरस्कार सोहळ्याचे काय होणार, असा प्रश्न यावेळी उपस्थित झाला आहे. यंदाचा पुरस्कार सोहळा रद्द करण्यात येईल. अन्यथा सरकारकडून आदेश येईपर्यंत पुढे ढकलण्यात येईल. अशी शक्यता यावेळी निर्माण झाली आहे.

एका सूत्राने या पुरस्कार सोहळ्याबाबत सांगितले की, हिंदुस्थानात अद्याप कोरोना नियंत्रणात आलेला नाही. त्यामुळे देशातील सर्वोत्तम खेळाडू व प्रशिक्षकांचा गौरव करण्यासाठी ही योग्य वेळ ठरणार नाही. त्यामुळे यंदाचा पुरस्कार सोहळा रद्द करण्यात येऊ शकतो. किंवा सरकारच्या आदेशाप्रमाणे पुढे ढकलण्यातही येऊ शकतो.

सुरक्षा महत्त्वाची

29 ऑगस्ट रोजी दरवर्षी आयोजित करण्यात येणारा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा यंदा होणार नाही हे जवळपास निश्चित आहे. खेळाडू, प्रशिक्षक व सोहळ्यात सहभागी होणाऱया संबंधित अधिकाऱयांच्या जीवाशी केंद्र सरकार खेळणार नाही. अशाप्रकारचे वृत्त मीडियामधून प्रसिद्ध करण्यात आले आहे.

..तर खेळाडू व प्रशिक्षकांना केव्हा पुरस्कार मिळणार

या वर्षी चार विभागांसाठी 500च्यावर खेळाडू व प्रशिक्षकांचे अर्ज या वर्षी आले आहेत. यंदाचा पुरस्कार सोहळा पुढे ढकलण्यात आला, तर ठीक आहे. पण हा सोहळा रद्द करण्यात आल्यास या वर्षी अर्ज केलेल्या खेळाडू व प्रशिक्षकांच्या अर्जाकडे पुढल्या वर्षी लक्ष दिले जाईल का. तसेच पुढल्या वर्षी टोकियो ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करणार्या खेळाडूंना 2021 सालच्या सोहळ्यात आधी प्राधान्य दिले जाईल. अशा वेळी या वर्षी पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्या खेळाडू व प्रशिक्षकांना मोठया नुकसानाला सामोरे जावे लागणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या