मुंबईकरांनो! हिंदुस्थानच्या युद्धनौकांना भेट देण्याची अनोखी संधी

96

सामना ऑनलाईन । मुंबई

कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने हिंदुस्थानच्या सागरी सीमांचे रक्षण करणाऱ्या नौदलाच्या काही युद्धनौकांना भेट देण्याची संधी सर्वांना मिळणार आहे. 26 आणि 27 जुलै रोजी मुंबईतील नौदल डॉकयार्डमध्ये या युद्धनौका विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य जनतेसाठी बघण्यासाठी खुल्या ठेवण्यात येतील.

नौदलाच्या जनसंपर्क विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 26 जुलै रोजी फक्त शालेय विद्यार्थ्यांना (इयत्ता पाचवी आणि पुढील)  या युद्धनौकांना भेट देता येणार आहे. तर 27 जुलै रोजी युद्धनौका सर्वांसाठी खुल्या असतील. सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंतच या युद्धनौका पाहता येतील.

मुंबईच्या बलार्ड इस्टेटजवळील टायगर गेटमधून युद्धनौकांवर जाण्यासाठीचा मार्ग खुला करण्यात येईल. युद्धनौका पाहण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र यावेळी नौदलाच्या नियमांचे पालन करणे प्रत्येक नागरिकासाठी बंधनकारक असणार आहे. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव युद्धनौका पाहण्यासाठी येताना मोबाईल, कॅमेरा, हँडबॅग्स घेऊन येऊ नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे. तसेच युद्धनौकांना भेट देण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकाकडे सरकारकडून प्राप्त झालेले ओळखपत्र किंवा आधारकार्ड असणे आवश्यक आहे.

आपली प्रतिक्रिया द्या