नेपाळमध्ये हिंदुस्थानी वृत्तवाहिन्यांच्या प्रसारणावरील बंदी हटवली

623

हिंदुस्थान आणि नेपाळमध्ये अजूनही तणाव कायम आहे. दोन्ही देशात तणाव निर्माण झाल्यानंतर नेपाळमध्ये हिंदुस्थानी वृत्तवाहिन्या आणि इतर वाहिन्यांच्या प्रसारणावर बंदी घालण्यात आली होती. आता रविवारी नेपाळने ही बंदी हटवण्यास सुरुवात केली आहे. रविवारी नेपाळ डिश होमचे संचालक सुदीप आचार्य यांनी सांगितले की, सर्व हिंदुस्थानी वाहिन्यांचे प्रसारण पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. आता हिंदुस्थानी वृत्तवाहिन्यांचे प्रसारण सुरू करण्यात आले आहे.

दोन्ही देशात तणाव वाढल्यानंतर 9 जुलैला नेपाळने हिंदुस्थानी वृत्तवाहिन्यांच्या प्रसारणावर बंदी घातली होती. हिंदुस्थानी वृत्तवाहिन्या नेपाळविरोधात वृत्त देत असल्याचे सांगत ही बंदी घालण्यात आली होती. मात्र, नेपाळमध्ये दूरदर्शनचे प्रसारण सुरू होते. आता नेपाळमध्ये पुन्हा वृत्तवाहिन्यांचे प्रसारण सुरू करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात नेपाळच्या संसदेत वादग्रस्त नकाशाला मंजुरी मिळाल्यानंतर दोन्ही देशातील तणाव वाढला आहे. या नकाशात नेपाळने कालापानी हा हिंदुस्थानचा भूभाग त्यांच्या नकाशात दाखवल्याने हिंदुस्थानचा त्याला विरोध आहे.

आपली प्रतिक्रिया द्या