एअर इंडियाचा इंधन पुरवठा बंद करण्याची इंडियन ऑइलची धमकी

14

सामना ऑनलाईन, मुंबई

दरदिवशी तब्बल 15 कोटींचा तोटा सहन करत असलेल्या एअर इंडियाच्या संकटात नवीन भर पडली आहे. बिल थकवल्यामुळे एअर इंडियाचा इंधन पुरवठा बंद करण्याचा इशारा इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने दिला आहे. मंगळवारी सायंकाळी 4 नंतर पुणे, पाटणा, चंदिगढ, कोचीन, विशाखापट्टणम आणि रांची यांसारख्या विमानतळांवर एअर इंडियाला इंधन न पुरवण्याचा पवित्रा इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने घेतला आहे. याचा एअर इंडियाच्या प्रवासी सेवेला फटका बसणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या