लंडनमध्ये हिंदुस्थानी वंशाच्या व्यावसायिकाची हत्या

38

सामना ऑनलाईन । लंडन

लंडनमध्ये एका हिंदुस्थानी वंशाच्या प्रसिद्ध व्यावसायिकाचा मृतदेह पोलिसांना आढळून आला आहे. या व्यावसायिकाचे अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली आहे. रमणिकलाल जोगिया (७४) असे त्या व्यावसायिकाचे नाव असून त्यांची दागिन्यांची चार दुकान आहेत. जोगिया हे लंडनमध्ये ‘गोल्डन माईल’ म्हणून प्रसिद्ध होते.

बुधवारी जोगिया हे त्यांच्या दुकानावरून घरी परतत असताना काही अज्ञात व्यक्तींनी त्यांना जबरदस्ती एका गाडीत बसवून त्यांचे अपहरण केले. तेव्हापासून जोगिया हे बेपत्ता होते. जोगिया यांच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार केली होती. त्यावेळी पोलीस तपासात ईस्ट मिडलॅण्ड येथील एका रस्त्यावरील सीसीटीव्हीत फुटेजमधून जोगिया यांचे अपहरण झाल्याचे समोर आले. शुक्रवारी दुपारी पोलिसांना स्टोगटोम परिसरातील गोलबाय लेनमध्ये रस्त्याच्या कडेला जोगिया यांचा मृतदेह आढळूनआला. पोलिसांनी त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविल्यानंतर जोगिया यांची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. अद्याप जोगिया यांच्या हत्येचे कारण स्पष्ट झालेले नाही. जोगिया यांची हत्या व्यावसायिक वादातून झाली आहे का याचा देखील पोलीस शोध घेत आहेत.

जोगिया हे त्यांची पत्नी, मुलांसोबत गेली अनेक वर्ष लंडन येथे वास्तव्य़ास आहेत. मुळचे गुजरातमधील कच्छ येथील रहिवासी असलेले जोगिया हे त्यांच्या आई वडीलांसोबत लंडन येथे आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या