हिंदुस्थानी वंशाच्या नागरिकाला न्यूझीलंडमध्ये शिवीगाळ

33
सौजन्य- फेसबुक

सामना ऑनलाईन । न्यूझीलँड

हिंदुस्थानी वंशाचा नागरिक असलेल्या नरिंदरवीर सिंग यांना न्यूझीलंडमध्ये वर्णद्वेषी शिवीगाळ करण्यात आली. हाती आलेल्या वृत्तानुसार, ऑकलंड येथे हा प्रकार घडला आहे. नरिंदरवीर सिंग हे गाडीतून प्रवास करत होते. तेव्हा एका वर्णद्वेषी माणसाने त्यांची गाडी अडवली आणि त्यांना शिवीगाळ केली. तसेच, पंजाबी समुदायाबद्दल द्वेष व्यक्त करत या वर्णदे्वषी माणसाने सिंग यांना आपल्या देशात परत जा अशी धमकीही दिली. या प्रकाराने सिंग यांना धक्का बसला असून त्यांनी या घटनेचा व्हिडीओ त्यांनी फेसबुकवर अपलोड केला आहे.

हिंदुस्थानी माणसांवर होणाऱ्या हल्ल्यांचं प्रमाण वाढताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेत कन्सास येथे बारमध्ये झालेल्या गोळीबारात श्रीनिवास कुचिभोतला या हिंदुस्थानी नागरिकाचा बळी गेला होता. लँसेस्टर येथे हर्निश पटेल या हिंदुस्थानी व्यापाऱ्याची त्याच्याच दुकानाबाहेर हत्या करण्यात आली. न्यूयॉर्कमध्ये एकता देसाई या तरुणीलाही अशाच प्रकारे वर्णद्वेषी हल्ल्याला सामोरं जावं लागलं होतं.

नरिंदरवीर सिंग यांनी अपलोड केलेला व्हिडीओ पाहा-

आपली प्रतिक्रिया द्या