हिंदुस्थानी वंशाच्या प्राध्यापिकेला वंशभेदाचा फटका, अमेरिकन कॉलेज विरोधात दाखल केला भेदभावाचा दावा

Lakshmi-Balachandra
लक्ष्मी बालचंद्र (फोटो सौजन्य: बॅबसन कॉलेज वेबसाइट)

 

वेलस्ली बिझनेस स्कूल, मॅसॅच्युसेट्समधील हिंदुस्थानी वंशाच्या सहयोगी प्राध्यापिकेने त्यांच्यावर वांशिक आणि लैंगिक भेदभाव केल्याचा आरोप करत खटला दाखल केला आहे, असे मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे. इंडिया टुडेने हे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

बॅबसन कॉलेजमधील उद्योजकतेच्या सहयोगी प्राध्यापिका लक्ष्मी बालचंद्र यांनी आरोप केला आहे की त्यांनी करिअरच्या संधी गमावल्या आहेत आणि त्यांना आर्थिक नुकसान, भावनिक त्रास आणि त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का लागला आहे. कारण त्यांच्यासोबत झालेल्या घटनेची चौकशी करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे, असे बोस्टन ग्लोब वृत्तपत्राने 27 फेब्रुवारी रोजी म्हटले आहे.

बालचंद्र 2012 मध्ये बॅबसनच्या फॅकल्टीमध्ये रुजू झाल्या. त्यांच्या खटल्यात, त्यांनी कॉलेजच्या उद्योजकता विभागाचे प्राध्यापक आणि माजी अध्यक्ष अँड्र्यू कॉर्बेट यांना ‘भेदभावपूर्ण वातावरणासाठी जबाबदार असलेले मुख्य गुन्हेगार’ म्हणून म्हटले आहे.

27 फेब्रुवारी रोजी बोस्टन येथील यूएस जिल्हा न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, बालचंद्र यांनी आरोप केला की कॉर्बेट, ज्यांनी क्लास असाइनमेंट्स, वर्ग वेळापत्रक आणि वार्षिक पुनरावलोकने पाहिली, त्यांनी त्यांना निवडक विषय शिकवण्याची विनंती करूनही त्यांना फक्त उद्योजकतेचे आवश्यक अभ्यासक्रम शिकवण्याची परवानगी दिली – तरीही त्यांनी यापूर्वी एमआयटी स्लोन स्कूल ऑफ मॅनेजमेंट आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये असे वर्ग शिकवले होते.

‘बॅबसन सफेद आणि पुरुष शिक्षकांना पसंती देतात आणि प्रामुख्याने त्यांच्यासाठी पुरस्कार आणि विशेषाधिकार राखून ठेवतात’, असे बालचंद्र यांच्या तक्रारीत आरोप आहे.

तक्रारीनुसार, त्यांना अनेक महत्त्वाची पदे आणि संशोधन आणि लेखन करण्यासाठीची अधिक संधी नाकारण्यात आली.

‘उद्योजकता विभागातील सफेद पुरुष प्राध्यापकांना असे विशेषाधिकार नियमितपणे दिले जातात’, असे तक्रारीत म्हटले आहे.

बालचंद्र यांच्या वकील मोनिका शहा यांनी सांगितले की, प्राध्यापकाने मॅसॅच्युसेट्स कमिशन अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशनमध्ये भेदभावाचा आरोपही दाखल केला आहे.

दरम्यान, बॅबसन कॉलेजने प्रतिक्रिया दिली आहे की ते अशा तक्रारी गांभीर्याने घेतात आणि त्यांची कसून चौकशी आणि निराकरण करण्यासाठी प्रोटोकॉल आणि संसाधने निश्चित करण्यात आले आहेत.

बॅबसन कॉलेजच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘महाविद्यालय हे वैविध्यपूर्ण जागतिक समुदायाचे घर आहे जेथे कॅम्पसच्या प्रत्येक पैलूमध्ये समानता आणि सहभागाचे मूल्य आणि समावेश केला जातो आणि जेथे कोणत्याही प्रकारचा भेदभाव खपवून घेतला जात नाही’, असे बॅबसन कॉलेजच्या प्रवक्त्याने सांगितले.

बालचंद्र, सध्या नॅशनल सायन्स फाउंडेशनच्या फेलोशिपसाठी रजेवर असून त्या नुकसान भरपाईची मागणी करत आहेत, असे अहवालात नमूद केले आहे.