अमेरिकेत हिंदुस्थानी तरुणाची हत्या

सामना ऑनलाईन । शिकागो

अमेरिकेतील इलिनॉईस (Illinois) प्रांतात दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात १९ वर्षाच्या अर्शद वहोरा याचा मृत्यू झाला. अर्शदचे ५५ वर्षांचे एक नातलग गोळीबारात जखमी झाले. अर्शद मूळचा गुजरातमधील नाडियादचा आहे.

शिकागोपासून ३० किमी. अंतरावर असलेल्या डोलटन (Doloton) येथे एका गॅस स्टेशनवर गोळीबाराची घटना घडली. दरोडा घालण्यासाठी आलेल्या दरोडेखोरांनी विरोध केला म्हणून अर्शद आणि त्याच्या नातलगाला लक्ष्य करुन गोळीबार केला. या प्रकरणी स्थानिक पोलीस तपास करत आहेत. अर्शदच्या जखमी नातेवाईकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या