फोटो स्टोरी : चेन्नईचे ‘सिक्स स्टार’

208

सामना ऑनलाईन । मुंबई

आयपीएलमध्ये दोन वर्षांनी पुनरागमन करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने हैदराबादचा पराभव करत सातव्यांदा आयपीएल फायनलमध्ये स्थान मिळवले आहे. फायनलपर्यंत चेन्नईच्या सहा खेळाडूंनी सत्र गाजवले. चला तर पाहुया कोण आहेत हे खेळाडू आणि त्यांची कामगिरी…

फाफ डू प्लेसिस –

duplessis

मुंबईत वानखेडे मैदानावर झालेल्या पहिल्या प्ले ऑफ सामन्यात हैदराबादचा २ विकेट्सने पराभव करत चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल २०१८ च्या फायनलमध्ये धडक मारली. चेन्नईच्या विजयाचा नायक ठरला दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार आणि सलामीवीर डू प्लेसिस. डू प्लेसिसने अखेरपर्यंत किल्ला लढवत ४२ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ६७ धावा ठोकल्या.

ड्वेन ब्राव्हो –

bravo-ipl2018
आयपीएलच्या ११ सत्राच्या सुरुवातीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने वानखेडे मैदानावर यजमान मुंबईचा एका विकेट्सने थरारक पराभव केला. मुंबईने दिलेले १६६ धावांचे आव्हान चेन्नईने ९ गडी गमावत पूर्ण केले. ब्राव्होच्या आक्रमक खेळीच्या जोरावर चेन्नईने मुंबईच्या हातातोंडाशी आलेला विजय हिसकावून घेतला. एकवेळ १७ व्या षटकात चेन्नईची स्थिती ८ बाद ११८ होती. परंतु त्यानंतर ब्राव्होने ३० चेंडूत ३ चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने ६८ धावांची मॅचविनिंग खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

सॅम बिलिंग्ज –

billings-ipl2018
यंदाच्या सत्रातील दुसऱ्या सामन्यात चेन्नईच्या घरच्या मैदानावर केकेआरने रसेलच्या ८८ धावांच्या तुफानी खेळीच्या जोरावर २०२ धावांचा डोंगर उभारला. या डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईने १९ व्या षटकाचा पाचव्या चेंडूवर विजय मिळवला. चेन्नईच्या विजयाचा हिरो ठरला तो सॅम बिलिंग्ज. आयपीएलमध्ये पहिलाच सामना खेळणाऱ्या बिलिंग्जने फक्त २३ चेंडूत २ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ५३ धावा कुटल्या.

एम.एस. धोनी –

dhoni-ipl2018
वाघ म्हतारा झाला तरी शिकार करायची विसरत नाही हे धोनीने पंजाबविरुद्धच्या सामन्यात दाखवून दिले. ‘धोनी संपला’ अशी टीका करणाऱ्या टिकाकारांना त्याची ही खेळी म्हणजे चोख उत्तर होते. पंजाबने विजयासाठी दिलेल्या १९८ धावांचा पाठवाग करताना चेन्नईच्या फलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे चेन्नईच्या विजयाच्या आशा धुसर झाल्या होत्या. ४४ चेंडूत ६ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ७९ धावांची खेळी करत धोनीने अखेरपर्यंत किल्ला लढवला. परंतु तो संघाला यंदाच्या सत्रातील सलग तिसरा विजय मिळवून देऊ शकला नाही. चेन्नईचा संघ २० षटकात ५ बाद १९३ पर्यंतच मजल मारू शकला.

शेन वॉटसन –

watson-ipl2018
पुण्यात राजस्थान रॉयल्स या जुन्या टीमविरुद्ध खेळणाऱ्या शेन वॉटसनच्या शतकाच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने राजस्थान रॉयल्सच्या विरुद्ध २०५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. शेन वॉटसनने आपल्या जुन्या टीमची अक्षरश: वाट लावली. त्याने ५७ चेंडूत १०६ धावा केल्या. यामध्ये ९ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश आहे. वॉटसनच्या आयपीएलमधील तिसऱ्या शतकाच्या जोरावर चेन्नईने राजस्थानचा ६४ धावांनी पराभव केला.

अंबाती रायडू –

ambati-rayadu

शेवटच्या चेंडूपर्यंत उत्कंठा ताणलेल्या रोमहर्षक झालेल्या सामन्यात चेन्नईने हैदराबादचा ४ धावांनी पराभव करत विजयी चौकार लगावला आहे. या सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अंबाती रायडूने स्पर्धेतील सर्वात तगड्या गोलंदाजीची तुफान धुलाई केली. रायडूने ३७ चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकारांसह ७९ धावा बदडल्या.

आपली प्रतिक्रिया द्या