रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या आरोग्य सेवा धोरणात बदल केला आहे. आता रेल्वे आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांना युनिक मेडिकल आयडेंटिफिकेशन कार्ड (UMID) जारी करणार आहे. या कार्डच्या मदतीने रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही ओळखीशिवाय रेल्वेच्या अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयांमध्ये आणि देशातील सर्व एम्समध्ये मोफत उपचार घेता येणार आहेत. हे कार्ड 100 रुपयांना बनवून मिळणार आहे. या नवीन कार्डचा फायदा सुमारे 12.5 लाख रेल्वे कर्मचारी, 15 लाखांहून अधिक पेन्शनधारक आणि 10 लाख आश्रितांना होणार आहे.
रेल्वे बोर्डाचे ट्रान्सफॉर्मेशनचे कार्यकारी संचालक प्रणव कुमार मलिक यांनी 2 सप्टेंबर रोजी हा आदेश जारी केला. हा आदेश तात्काळ लागू करण्यात आला आहे. डॉक्टर नेहमी त्यांच्या सोयीनुसार इतर रुग्णालयाची नावे सुचवतात. अशी गंभीर तक्रार रेल्वेचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी केली होती. त्यांच्या तक्रारींनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
रेल्वे आता सर्व कर्मचारी, पेन्शनधारक आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांच्या उपचारांसाठी रुग्णालये आणि चाचणी केंद्रांची यादी लवकरच जाहीर करणार आहे. तत्कालीन परिस्थितीत कोणत्याही विशिष्ट रुग्णालयाची शिफारस करण्यात येईल. ही शिफारस केवळ 30 दिवसांसाठी उपलब्ध असणार आहे. हेल्थ मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम (HMIS) द्वारे UMID कार्ड डिजी लॉकरमध्ये ठेवले जाईल. कर्मचारी-पेन्शनधारकांच्या प्रोफाइलवरही हे उपलब्ध असेल.