रेल्वे हमालांच्या पेन्शनसाठी तिकिटावर कर

नवी दिल्ली – रेल्वेच्या २० हजार कुलींना ‘पीएफ’मध्ये समाविष्ट केले जाण्याची शक्यता आहे. यासाठी रेल्वेच्या प्रत्येक प्रवासी तिकिटावर १० पैसे कर आकारण्याचा सरकार विचार करीत आहे. या १० पैसे करामुळे वर्षाला चार कोटी ३८ लाख रुपये जमा होतील. यातून रेल्वे हमालांना भविष्य निर्वाह निधी (पीएफ) पेन्शन आणि गट विमा सहजपणे देता येईल असे सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या