1 जूनपासून नवीन 200 रेल्वे गाड्या धावणार, कोणत्या स्टेशनवर थांबणार; पाहा यादी

2648

हिंदुस्थानी रेल्वे 1 जूनपासून 200 प्रवासी रेल्वे गाड्या सुरू करणार आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. याआधी केंद्रीय रेल्वेने यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली होती. या गाड्यांमध्ये प्रवास करण्यासाठी 21 मे पासून तिकिटांचे बुकिंग सुरू झाले आहे. रेल्वेने सर्व विशेष गाड्यांसाठी आगाऊ आरक्षण कालावधी (एआरपी) 30 दिवसांवरून 120 दिवसांपर्यंत वाढविला आहे.

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, 1 जूनपासून सुरु होणाऱ्या 200 गाड्यांसाठी अधिकृत वेबसाइट आणि मोबाइल अॅपद्वारे तिकीट बुक करू शकतात. या व्यतिरिक्त निवडक रेल्वे स्थानक, टपाल कार्यालये, प्रवासी तिकीट सुविधा केंद्र, अधिकृत एजंट, प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) आणि सामान्य सेवा केंद्राच्या (सीएससी) काउंटरवरून देखील तिकीट बुक करू शकतात.

  • 1 जूनपासून सुरु होणाऱ्या रेल्वेची यादी 

untitled-1-copy

untitled-2-copyदरम्यान, सर्व प्रवाशांना प्रवासादरम्यान मास्क घालणे बंधनकारक असेल. तसेच आपण जात असलेल्या स्टेशनवर पोहोचल्यानंतर प्रवाशांना राज्य / केंद्रशासित प्रदेशांनी बनविलेले हेल्थ प्रोटोकॉल पाळावे लागणार आहे. अधिक माहितीसाठी रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

आपली प्रतिक्रिया द्या