
देशातील धार्मिक स्थळांचे दर्शन घडवण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून भारत गौरव यात्रा हा विशेष ट्रेन चालवण्यात येते. 22.06.2023 रोजी पुणे-उज्जैन-आग्रा-मथुरा-हरिद्वार-ऋषिकेश-अमृतसर-वैष्णोदेवी आणि 01.07.2023 रोजी पुण्याला परत येणारी भारत गौरव ट्रेन चालवण्यात येणार आहे. पुणे-उज्जैन-आग्रा-मथुरा-हरिद्वार-ऋषिकेश-अमृतसर-वैष्णोदेवी आणि पुणे परत पर्यटकांसाठी रेल्वे भारत गौरव ट्रेन चालवण्यात यणार आहे.
IRCTC द्वारे चालवली जाणारी भारत गौरव टुरिस्ट ट्रेन 22.06.2023 रोजी पुण्याहून निघेल, उज्जैन-आग्रा-मथुरा-हरिद्वार-ऋषिकेश-अमृतसर-वैष्णोदेवी या चक्राकार मार्गाने प्रवास करेल आणि 01.07.2023 रोजी पुण्याला परत येईल.
या ट्रेनसाठी लोणावळा, कर्जत, कल्याण, वसई रोड, सुरत, वडोदरा, उज्जैन, आग्रा, हरिद्वार, अमृतसर, कटरा, आणि परत वडोदरा, सुरत, वसई रोड, कल्याण, कर्जत आणि लोणावळा हे थांबे असतील. IRCTC इकॉनॉमी (शयनयान क्लास), कम्फर्ट (तृतीय वातानुकूलित) आणि डिलक्स द्वितीय वातानुकूलित) च्या ऑफरसह 9 रात्री / 10 दिवसांचे पॅकेज देण्यात येत आहे.
या प्रवासात पर्यटकांना ओंकारेश्वर मंदिर, महाकालेश्वर मंदिर, ताजमहाल, कृष्ण जन्मभूमी, ऋषिकेश (गंगा आरतीसह), सुवर्ण मंदिर, बाघा बॉर्डर आणि माता वैष्णोदेवी मंदिर यांचे दर्शन घडवण्यात येणार आहे.
भारत गौरव टुरिस्ट ट्रेन देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या “एक भारत श्रेष्ठ भारत” आणि “देखो अपना देश” या उपक्रमांच्या अनुषंगाने आहे. ही IRCTC टुरिस्ट ट्रेन एक सर्वसमावेशक टूर पॅकेज असेल आणि IRCTC पाहुण्यांना सुरक्षित आणि संस्मरणीय अनुभव देण्यासाठी प्रयत्न करेल. अधिक तपशीलांसाठी कृपया www.irctctourism.com ला भेट द्या.