हिंदुस्थानी नेमबाज क्रोएशियाला जाणार; युरोपियन चॅम्पियनशिपसाठी सज्ज

टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारे हिंदुस्थानी नेमबाज 11 मे रोजी क्रोएशिया येथील झॅगरेब येथे आयोजित करण्यात येणाऱया युरोपियन चॅम्पियनशिपसाठी रवाना होणार आहेत. त्यानंतर हिंदुस्थानी नेमबाज तेथेच सराव करणार आहेत. शिवाय तेथूनच टोकियो ऑलिम्पिकसाठी रवाना होणार आहेत, अशी माहिती राष्ट्रीय रायफल असोसिएशन ऑफ इंडियाकडून देण्यात आली.

युरोपियन चॅम्पियनशिपचे आयोजन 20 मे ते 6 जून या कालावधीत करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होता यावे यासाठी हिंदुस्थानच्या सर्व नेमबाजांसाठी राष्ट्रीय रायफल असोसिएशन ऑफ इंडियाकडून सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. हिंदुस्थानचे नेमबाज चार्टर्ड विमानाने झॅगरेब येथे पोहचणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या