नवं वर्षाचं गिफ्ट, चांद्रयान-3 ला हिरवा कंदिल, इथं बनणार नवं स्पेस पोर्ट

440
k-sivan

नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसाच्या निमित्तानं हिंदुस्थानची अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी 2019 मध्ये मिळवलेलं यश आणि 2020 मधील आपलं लक्ष्य स्पष्ट केलं. ‘3 जीपीपी’नं मंजूरी दिल्यानं लवकरच सर्व मोबाईलमध्ये आपलं जीपीएस असेल. तसंच सरकारनं चांद्रयान – 3 ला अनुमती दिली आहे. चांद्रयान – 3 हे चांद्रयान – 2 सारखंच असेल, अशी माहिती के. सिवन यांनी दिली. मात्र यंदा लँडर-रोवर आणि प्रोपल्शन मॉडल असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच थुथुकुडी येथे नवीन स्पेस पोर्ट तयार करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

चांद्रयान – 2 चंद्राच्या पृष्ठतलावर आदळल्यानं इस्रोच्या मोहिमेला 2019 मध्ये काहीसं अपयश आलं असलं तरी देखील चांद्रयान – 2 चं ऑर्बिटर कार्यरत आहे. त्यामुळे यंदा लँडर-रोवर आणि प्रोपल्शन मॉडलच पाठवलं जाणार आहे. आणि चांद्रयान – 2 च्याच ऑर्बिटरचा उपयोग करण्यात येणार आहे. 2019 मध्ये ‘गगनयान’वर बरंच काम झालं आहे. 2020 मध्ये गगनयानसाठी निवडण्यात आलेल्या चार अंतराळविरांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण रशियात देण्यात येणार असल्याचं देखील सांगण्यात आलं आहे.

गगनयान प्रोजेक्टचा पहिला टप्पा म्हणून अनमॅन्ड म्हणजेच मानवरहित मिशनचं या वर्षात प्लानिंक करण्यात येईल. जर हे काम पूर्ण झाले तर यंदा किंवा मग पुढल्यावर्षी पूर्ण करण्यात येईल. असे मिशन सोप्पे नसतात. यासाठी प्रचंड तयारी करावी लागते. कारण एखादी छोटी चूक देखील मोठ्या नुकसानासाठी कारणीभूत ठरू शकतं. त्यामुळेच गगनयान प्रोजेक्टमध्ये अत्यंत सतर्कता ठेवावी लागते.

आपली प्रतिक्रिया द्या