झटका! शेअर बाजारात घसरण!!

हिंदुस्थानी शेअर बाजार मंगळवारी चांगलाच घसरला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 636 अंकांच्या घसरणीसह 80,737 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 174 अंकांनी घसरून 24,542 अंकांवर बंद झाला. घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे 1.84 लाख कोटी रुपये बुडाले. अदानी पोर्टस, बजाज फिनसर्व, अदानी एंटरप्राइजेस, कोल इंडिया, पॉवर ग्रीडचे शेअर्स घसरले.