‘या’ कारणामुळे होतात देशात सर्वाधिक आत्महत्या

2527

हिंदुस्थानात सध्या आत्महत्या करण्याचे प्रमाण घटले आहे. ही बाब दिलासादायक असली तरी नातेसंबंधांतील अपयशामुळे किंवा तणावामुळे होणाऱ्या आत्महत्यांमध्ये वाढ झाल्याचे समोर आले आहे. बदलत्या लाईफस्टाईलमुळे नातेसंबंधांमध्ये तणाव वाढत चालला असून त्यातून या आत्महत्यांचे प्रकार वाढत आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने शुक्रवारी 2016 चे आकडे जारी केले असून त्यातून ही धक्कादायक माहिती समोर आली.

सध्या आत्महत्येचं सर्वात मोठं कारण हे कौटुंबिक समस्या असून त्याखालोखाल कर्जबाजारीपणा, बेरोजगारी, आजारपण अशा कारणांची संख्या जास्त आहे. महिलांमध्ये लग्नातील, प्रेमसंबंधातील समस्या, परिक्षेतील अपयश यामुळे आत्महत्या केल्याचे प्रमाण जास्त आहे. तर पुरुष लग्नातील तणाव, बेरोजगारी, एकतर्फी प्रेम, व्यसनाधीनता या कारणांमुळे सर्वाधिक आत्महत्या करतात. 2016 मध्ये या सर्व कारणांमुळे सर्वाधिक आत्महत्या झाल्याचे समोर आले आहे. तसेच महिलांच्या तुलनेत पुरुष आत्महत्या करण्याचे प्रमाण जास्त आहे अशी धक्कादायक माहिती देखील या अहवालातून दिली गेली आहे. यातील सर्वाधिक लोकांनी घरात गळफास घेऊन व विष पिऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. हिंदुस्थानातील आत्महत्याचा दर हा रशिया, जपान, फ्रांस, जर्मनी आणि दक्षिण आफ्रिकेपेक्षा कमी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या