हिंदुस्थानाचा ‘गरगरीत’ विजय

सामना ऑनलाईन, हैदराबाद

हिंदुस्थानी संघाचे फिरकीपटू आर.अश्विन आणि रवींद्र जाडेजा यांच्या फिरकीमुळे बांग्लादेशच्या फलंदाजांना गरगरी आल्याने त्यांनी हिंदुस्थानीसंघासमोर लोटांगण घातलं. बांग्लादेशचा हिंदुस्थान विरूद्ध हा एकमेव कसोटी सामना होता. या विजयामुळे हिंदुस्थानी संघाने आता सहा सलग कसोटी मालिका जिंकल्या आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वात खेळलेल्या १९ सामन्यांमध्ये हिंदुस्थानी संघाला एकातही अपयश आलेलं नाही हे विशेष आहे. विराटने आज सुनील गावस्कर यांचा १८ सलग कसोटी सामने जिंकण्याचा विजय आज मोडला.

बांग्लादेशविरूद्ध हिंदुस्थानी संघाने २०८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. हिंदुस्थानी संघाने बांग्लादेशसमोर विजयासाठई ४५८ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र बांग्लादेशचा संघ ५ व्या दिवशी दुसऱ्या सत्रात २५० धावांवर गुंडाळला गेला. दुसऱ्या डावात आर.अश्विनने आणि रवींद्र जाडेजा दोघांनी प्रत्येकी ४ बळी घेतले. इशांत शर्माला २ बळी टीपण्यात यश आलं.

ishant-sharma-victory

दुसऱ्या डावामध्ये बांग्लादेशाच्या महम्मदुल्लाने सर्वाधिक म्हणजे ६४ धावा केल्या. बांग्लादेशचा पहिला डाव ३८८ धावांवर आटोपला होता. हिंदुस्थानी संघाने पहिल्या डावात विराट कोहली च्या द्विशतकाच्या जोरावर ६८७ धावांचा विशाल डोंगर उभा केला होता. दुसऱ्या डावात हिंदुस्थानी संघाने ४ बळींच्या मोबदल्यात १५९ धावा केल्या होत्या

 

आपली प्रतिक्रिया द्या