ऑलिम्पिक टेस्ट इव्हेंट : हिंदुस्थानने यजमान जपानला 2–1 ने धूळ चारली

156

हिंदुस्थानच्या महिला हॉकी संघाने ऑलिम्पिक टेस्ट इव्हेंटची दमदार सुरुवात केली. सलामीच्याच लढतीत यजमान जपानला 2-1 अशा फरकाने धूळ चारण्यात हिंदुस्थानी संघाला यश लाभले.

गुरजीत कौरने नवव्या मिनिटालाच पेनल्टी कॉर्नरवर दमदार गोल करीत हिंदुस्थानला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. मात्र हिंदुस्थानला ही आघाडी जास्त काळ टिकवता आली नाही. एकी मितसुहाशी हिने 16व्या मिनिटाला गोल करीत जपानला 1-1 अशी बरोबरी साधून दिली. गुरजीत कौरने 35व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर आणखी एक गोल करीत हिंदुस्थानला पुन्हा आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दोन्ही संघाला एकही गोल करता आला नाही. त्यामुळे हिंदुस्थानने ही लढतीत 2-1 अशा फरकाने जिंकली.

आपली प्रतिक्रिया द्या