हॉकी : हिंदुस्थानकडून न्यूझीलंडचा धुव्वा, 4-0 ने हरवले

243

हिंदुस्थानी महिला हॉकी संघाने यंदाच्या ऑलिम्पिक वर्षाची सुरुवात शानदार विजयाने केली आहे. टोकियो ऑलिम्पिकला आता काही महिनेच उरले आहेत. हिंदुस्थानी कर्णधार राणी रामपालचे 2 अफलातून गोल आणि हिंदुस्थानी बचावफळीची स्तुत्य कामगिरी याच्या बळावर न्यूझीलंड दौऱ्यातील पहिल्या लढतीत शनिवारी हिंदुस्थानने यजमान किवीजना 4-0 असे पराभूत करीत दौऱ्याची सुरुवात शानदार विजयाने केली.हिंदुस्थानचा महिला संघ न्यूझीलंडविरुद्ध 4 तर इंग्लंडविरुद्ध 1 लढत खेळणार आहे.

शनिवारचा सामना हिंदुस्थानी फॉर्वर्डसनीच गाजवला. तुफानी आक्रमणे रचणाऱ्या कर्णधार राणी रामपालने लढतीच्या तिसऱ्या सत्रात 1 गोल नोंदवत संघाला 1-0 असे आघाडीवर नेले. त्यानंतर याच सत्रात शर्मिलाने दुसरा गोल नोंदवत हिंदुस्थानची आघाडी 2-0 अशी वाढवली.चौथे आणि अखेरचे सत्रही हिंदुस्थानी फॉर्वर्डसचेच ठरले. या सत्रात कर्णधार राणी पुन्हा यजमानाच्या गोलक्षेत्रात घुसली आणि तिने गोल नोंदवत संघाला 3-0 अशी मोठी आघाडी मिळवून दिली. अखेरच्या मिनिटांत नमिताने चौथा गोल नोंदवत हिंदुस्थानच्या 4-0 विजयावर शिक्कामोर्तब केले.

आपली प्रतिक्रिया द्या