हिंदुस्थान महिला हॉकी वर्ल्ड लीगच्या उपांत्य फेरीत

11

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थानी महिला हॉकीपटू वंदना कटारिया हिने केलेल्या गोलच्या जोरावर हिंदुस्थान महिला हॉकी वर्ल्ड लीगच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. हिंदुस्थानी महिला हॉकी संघाने बेलारूसच्या संघाला १-० अशी मात दिली.

ही लढत सुरुवातीपासूनच अटीतटीची राहिली होती. दोन्ही संघाना पेनल्टी कॉर्नर मिळूनही त्यांचा योग्य उपयोग करून घेण्यात दोन्ही संघ अपयशी ठरले. पेनल्टी कॉर्नरमध्ये बेलारुसच्या आक्रमणाला रोखण्यात हिंदुस्थानच्या सविता सिंह हिला यश मिळालं. २६ व्या मिनिटाला वंदना कटारियाने फिल्ड गोल करून हिंदुस्थानला लढतीत आघाडी मिळवून दिली. मध्यंतरानंतरही हिंदुस्थानने आघाडी कायम राखत बेलारुसवर विजय मिळवला.

आपली प्रतिक्रिया द्या