इटलीमध्ये काम करणाऱ्या एका हिंदुस्थानी शेतमजुराचा हात तुटल्याच्या घटनेनंतर रस्त्याच्या त्याला मदत करण्याऐवजी रस्त्याच्या कडेला फेकून दिल्यानं बुधवारी त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती इटलीच्या एका मंत्र्याने दिली असून त्यांनी या ‘क्रूर कृत्याचा’ निषेध केला आहे. तसंच घटनेच्या तपासाचे आदेश दिले आहेत.
लाखो हिंदुस्थानी स्थलांतरित कामगारांचे घर मानले जाणाऱ्या रोमच्या दक्षिणेकडील ग्रामीण भागात लॅटिना येथील शेतात काम करताना सतनाम सिंग सोमवारी जखमी झाले.
‘लॅटिनाच्या ग्रामीण भागात गंभीर अपघात झालेल्या आणि अत्यंत गंभीर परिस्थितीत सोडून देण्यात आलेल्या हिंदुस्थानी शेत मजूराचा मृत्यू झाला आहे’, असं कामगार मंत्री मरिना कॅल्डेरोन यांनी संसदेत सांगितलं.
‘हे अत्यंत क्रूर कृत्य होते’, असं त्या म्हणाल्या. अधिकारी चौकशी करत आहेत आणि जे जबाबदार आहेत त्यांना शिक्षा होईल असा विश्वास त्यांनी यावेळी दिला.
फ्लाई सीजीआयएल ट्रेड युनियनच्या म्हणण्यानुसार, 30 ते 31 वर्षांचे सतनाम सिंग हे कायदेशीर कागदपत्रांशिवाय काम करत होते. सिंग गवत कापत असताना मशीनने त्यांचा हात कापला गेला.
‘त्याच्या मालकानं मदत करण्याऐवजी त्याला त्याच्या घराजवळ कचऱ्याच्या पिशवीप्रमाणे फेकून दिलं’, असं म्हटलं आहे. एखाद्या ‘भयपटासारखी’ ही स्थिती आहे.
पोलिसांनी सांगितलं की सिंग यांच्या पत्नी आणि मित्रांनी माहिती दिल्यानंतर ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले होते आणि एअर ॲम्ब्युलन्स पाठवण्यात आली होती.
‘त्यांना रोममधील रुग्णालयात नेण्यात आले परंतु (आज) दुपारच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला’, असे लॅटिनातील पोलीस प्रवक्त्यानं एएफपीला सांगितलं.
मध्य-डाव्या डेमोक्रॅटिक (centre-left Democratic Party) पक्षानं कामगारांच्या शोषणासाठी ओळखल्या जाणाऱ्या भागात, ‘सभ्यतेचा पराभव’ अशा शब्दात माणसाला मिळालेल्या वागणुकीचा निषेध केला.
‘गँगमास्टर्सविरुद्धचा लढा, मानव प्रतिष्ठा, जीवनमान आणि कामावरील परिस्थिती सुधारण्यासाठीचा लढा हे आमचं प्राधान्य असलं पाहिजे’, असं त्यांनी X वर म्हटलं आहे.