Photo – ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानसाठी पदक आणणारे कुस्तीपटू

टोकियो ऑलिम्पिकमध्ये रवी कुमार दहिया याने हिंदुस्थानसाठी आणखी एक मेडल आणले आहे. 57 किलो वजनी गटामध्ये रवी कुमार दहिया याने हिंदुस्थानसाठी रौप्यपदक जिंकले. ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानसाठी कुस्तीमध्ये पदक आणणारी रवी पाचवा खेळाडू ठरला आहे. याआधी कोणत्या कुस्तीपटूंनी अशी कामगिरी केलीय पाहूया…

1. खाशाबा जाधव

khashaba-jadhav

ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत पहिले मेडल आणण्याचा मान खाशाबा जाधव यांना जातो. जाधव यांनी 1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते.

2. सुशील कुमार

sushil-kumar

खाशाबा जाधव यांच्यानंतर कुस्तीमध्ये मेडल मिळवण्यासाठी हिंदुस्थानला तब्बल सहा दशक वाट पहावी लागली. 2008 ला बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुशील कुमार याने कांस्यपदक पटकावले, तसेच 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये त्याने रौप्यपदक जिंकले.

3. योगेश्वर दत्त

yogeshwar-datt

एकाच ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत दोन पदक आणण्याची कामगिरी हिंदुस्थानने 2012 ला केली. सुशील कुमार पाठोपाठ योगेश्वर दत्त याने कांस्यपदकावर नाव कोरले.

4. साक्षी मलिक

sakshi-malik

हिंदुस्थानला ऑलिम्पिकमध्ये महिला कुस्तीत पहिले पदक साक्षी मलिकने जिंकून दिले. तिने 2016 रिओ ऑलिम्पिकमध्ये कास्यपदक जिंकले.

आपली प्रतिक्रिया द्या