लस घेतल्यावर हिंदुस्थानी तरुणाचा बर्फावर भांगडा

कोरोना व्हायरसने जगभरात धुमाकूळ घातला आहे. आता पुठे कोरोनाची लस बाजारात आली आहे. त्यामुळे लोकांच्या जिवात जीव आला आहे. सध्या अनेक देशांमध्ये कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे.

यातच कॅनडाचा डान्सर गुरदीप पंधेरने कोरोना लशीचा पहिला डोस घेतला. यानंतर त्यांनी चक्क बर्फावर भांगडा करून आपला आनंद व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

सर्वसाधारणपणे लस घेतल्यानंतर लोक आपल्या घरी जाऊन आराम करतात. मात्र, गुरदीपने असे न करता लस घेतल्यानंतर बर्फ झालेल्या एका तलावावर भांगडा केला. गुरदीपच्या या अनोख्या अंदाजाला लोकांची जबरदस्त पसंती मिळत आहे.

गुरदीप यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना सांगितले, लस घेतल्यानंतर तो थेट युकोन येथे गोठलेल्या तलावावर गेला आणि आनंद व्यक्त करण्यासाठी त्यांनी जबरदस्त भांगडा केला. त्यांच्या या पोस्टमध्ये 55 सेकंदांचा एक व्हिडीओदेखील आहे. गुरदीप यांचा हा व्हिडीओ ट्विटरवर 26 लाख हून अधिक वेळा बघितला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या