हिंदुस्थानींची नजर होत आहे कमकुवत, संख्या 30 वर्षात दुप्पटीने वाढली

हिंदुस्थानातील 7.9 कोटी लोक असे आहेत ज्यांची नजर कमकुवत झाली आहे. गेल्या 30 वर्षात नेत्रहीन होण्याची शक्यता असणाऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर वाढत असून सध्या ती दुप्पट झाली आहे.

1990 मध्ये देशात 4 कोटी लोक असे होते ज्यांच्या डोळ्यात हलका दोष (MSVI)होता. जवळच्या वस्तूंवर देखील चटकन ओळखता येत नाही अशा लोकांची संख्या 13 कोटीच्या घरात पोहोचली आहे. विजन लॉस एक्‍सपर्ट ग्रुप (VLEG) आणि इंटरनॅशनल एजेंसी फॉर द प्रिवेंशन ऑफ ब्‍लाइंडनेस (IAPB) ने हे आकडे जारी केले आहेत.

वाढत्या वयाचा नजरेवर परिणाम

तज्ज्ञांच्यामते सामान्य आणि गंभीर दृष्टी दोषींची संख्या वाढण्यास देशातील लोकांची जीवनशैली कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. 1990 मध्ये हिंदुस्थानींचे सरासरी आयुष्यमान 59 वर्षे होते, तर 2019 मध्ये ते 70 वर्ष झाले. ताजे आंकडे दर्शवतात की देशात 70% नेत्रहीन व्यक्ती 50 वर्षाहून अधिक वयाच्या आहेत.

तसेच डायबिटीज (मधूमेह)च्या रोगींमुळे दृष्टीदोष निर्माण होणे किंवा दृष्टी जाण्याच्या तक्रारी अधिक वाढल्या आहेत. प्रत्येक 6 मागे एक डायबिटिज रुग्ण रेटिनोपॅथी (मधूमेहामुळे खराब झालेला रेटिना) या आजाराशी तोंड देत आहे. चीन (11.6 कोटी) पाठोपाठ हिंदुस्थानात सर्वात जास्त (7.7 कोटी) डायबिटीजचे रुग्ण आहेत.

हिंदुस्थानात ‘नियर विजन लॉस’ या presbyopia (जवळचा दृष्टी दोष) ची प्रकरणे 30 वर्षांत दुप्पटीपेक्षाही अधिक झाले आहेत. 1990 मध्ये 5.77 कोटी लोकांची हीच समस्या होती. तर 2019 मध्ये 13.76 कोटी हिंदुस्थानी ‘नियर विजन लॉस’ने ग्रासले होते.

जगभरात सर्वाधिक नेत्रहीन हे हिंदुस्थानात आढळतात. देशात 92 लाख लोक दृष्टीहीन आहेत. तर चीन मध्ये  दृष्टीहीन लोकांची संख्‍या 89 लाख इतकी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या