सध्याचं युग हे डिजिटल युग म्हणून ओळखले जाते. अशात आता डिजिटल गोल्ड हा एक अनोखा पर्याय ग्राहकांच्या तो पसंतीस उतरला आहे. गुंतवणूकदारांना याचा अधिक फायदा असल्याचं जाणवत असल्याने या गुतवणुकीकडे हिंदुस्थानी वळत असल्याचं पाहायला मिळत आहे. आधुनिक आणि नाविन्यपूर्ण स्वरूपात गुंतवणूक करण्याची संधी यातून उपलब्ध होत आहे.
डिजिटल सोन्यातील गुंतवणूकदार आणि पारंपारिक-गुंतवणूकदार यांच्याबाबत अलीकडेच नावीद्वारे केलेल्या एका अभ्यासात हिंदुस्थानात डिजिटल सोन्यात मोठी गुंतवणूक होत असल्याचं आढळून आलं आहे.
नावीने केलेल्या संशोधनातून डिजिटल सोन्याच्या गुंतवणुकीला चालना देणारी प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत:
1. सोने = उत्तम परतावा
50 टक्के गुंतवणूक केली, कारण अलीकडच्या काळात सोन्याने चांगला परतावा मिळवून दिलेला आहे.
2. डिजीटल सोने = चोरी होण्याची जोखीम नाही
39 टक्के लोकांना असे वाटते की, डिजिटल सोने हे खरेखुरे सोने घरी ठेवण्यापेक्षा कमी धोकादायक आहे- चोरी होण्याची अजिबात चिंता नाही.
3. सर्वात शुद्ध सोने खरेदी केल्याचे समाधान
36% लोकांनी ‘डिजिटल गोल्ड’ मध्ये त्याच्या शुद्धतेच्या पैलूमुळे म्हणजेच 24-कॅरेट शुद्ध सोने खरेदी करण्याच्या क्षमतेमुळे गुंतवणूक केली आहे.
4. डिजिटल सोने अधिक सोयीस्कर आहे.
5. डिजिटल सोने घेण्याचा पर्याय देणाऱ्या ॲप्सद्वारे कधीही खरेदी, विक्री आणि डिजिटल सोन्याच्या गुंतवणुकीचा मागोवा घेण्याची सोय 25 टक्के लोकांना आवडते.
नावीव्दारे केलेल्या अभ्यासातून अधोरेखित केल्याप्रमाणे डिजिटल सोन्याच्या गुंतवणुकीला रोखणारे प्रमुख अडथळे खालीलप्रमाणे आहेत.
1. गुंतवणूक प्रक्रिया आणि फायदे याबद्दल अनिश्चितता
67% गैर-वापरकर्ते डिजिटल सोन्यात गुंतवणुकीच्या प्रक्रियेबद्दल किंवा त्यातून मिळणाऱ्या फायद्यांबद्दल अनभिज्ञ होते.
2. भौतिक सोन्याचा ‘स्पर्श आणि अनुभव’
ज्वेलर्सकडून खरेदी केलेल्या सोन्याला ‘स्पर्श आणि अनुभव’ करण्याच्या क्षमतेमुळे 44 टक्के व्यक्तींनी भौतिक स्वरुपातील सोने खरेदीला प्राधान्य दिले आहे.
3. अन्य घटक
डिजिटल सोन्यात गुंतवणूक न करण्याची काही इतर कारणे म्हणजे समभागांच्या तुलनेत कमी परतावा, ऑनलाइन फसवणुकीची भीती, डिजिटल किंवा भौतिक सोने खरेदी करताना जीएसटी आकारला जातो. (प्रत्येक कारणासाठी 37 टक्के)
नावीव्दारे केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष हे अधिक आर्थिक साक्षरता वाढवण्याची आणि सामान्य ग्राहकांच्या समस्या तसेच डिजिटल सोन्याच्या फायद्यांबद्दलचे प्रश्न सोडवण्याची गरज अधोरेखित करतात. यामुळे ग्राहकांना आधुनिक,नाविन्यपूर्ण स्वरूपातील सोन्याच्या कालातीत आनंद घेता येईल आणि त्यामुळे ते डिजीटल सोने अधिक प्रमाणात खरेदी करत जातील.