अमेरिकेत हिंदुस्थानी वंशाच्या शीख तरुणावर हल्ला

सामना ऑनलाईन । वॉशिंग्टन

अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन येथील केंट भागात हिंदुस्थानी वंशाच्या शीख तरुणावर शुक्रवारी हल्ला झाला. तुमच्या देशात परत जा अशी धमकी देत ३९ वर्षाच्या शीख तरुणावर गोळीबार करण्यात आला.

घराबाहेर गाडीचे काम करत असलेल्या शीख तरुणासमोर येऊन एका चेहरा झाकलेल्या तरुणाने वाद घालायला सुरुवात केली. वाद घालणाऱ्याच्या उच्चारावरुन तो अमेरिकन असल्याचा अंदाज शीख तरुणाला आला. आपल्याला जाणून घेण्याचा प्रयत्न होत असल्याचे लक्षात येताच मुद्दाम वाद घालण्यासाठी आलेल्या तरुणाने गोळीबार केला आणि तो घटनास्थळावरुन पळून गेला. जखमी शीख तरुणावर रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. हल्लेखोराचा तपास सुरू आहे; अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.

अमेरिकेत राहणा-या हिंदुस्थानींवर गोळीबार होण्याची ही आठवड्याभरातील तिसरी घटना आहे. मागच्या आठवड्यात अमेरिकेतील कन्सासमध्ये हिंदुस्थानी तरुणाची वंशभेदातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गुरुवारी रात्री दक्षिण कॅरोलिनामध्ये एका हिंदुस्थानी वंशाच्या उद्योजकाची हत्या करण्यात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या