देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 8 लाखाच्या पार

492

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 8 लाखाच्या पार गेला आहे. गेल्या २४ तासात देशात 27, 114 कोरोनाग्रस्त आढळून आले असून आतापर्यंतचा आकडा 8,20,916 वर पोहोचला आहे. गेल्या काही दिवसात 22 ते 27 हजाराने रुग्ण वाढत असल्याने यावेळेस लाखभर आकडा पार करण्यास अवघ्या पाच दिवस लागले.

देशात गेल्या 24 तासात 519 जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 22, 123 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या 2,83,407 अॅक्टिव्ह रुग्ण असून 5,15386 रुग्ण बरे झाले आहेत. गेल्या 24 तासात 19 हजार रुग्ण बरे झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या