इतर देशांच्या तुलनेत हिंदुस्थानची अर्थव्यवस्था मजबूत: निर्मला सीतारामन

677
nirmala-sitharam-pti

अमेरिका आणि चीनमधील व्यापारयुद्धामुळे जागतिक अर्थव्यवस्था बदलत आहे. फक्त हिंदुस्थानातच नाही तर जगभरात मंदी आली आहे. या स्थितीतही हिंदुस्थानची अर्थव्यवस्था इतर देशांच्या तुलनेत मजबूत आहे, असा दावा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी केला. मोदी सरकारच्या कार्यकाळात देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे, असा आरोप विरोधकांकडून होत आहे. त्यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारची बाजू मांडली. अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी उपाययोजना करण्याला प्राधान्य देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

देशात ‘कॅश फ्लो’ वाढवण्यासाठी 5 लाख कोटी रुपये देण्याची तसेच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी 70 हजार कोटींचं पॅकेज देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा सीतारामन यांनी केली. देशाची अर्थव्यवस्था, विकास दर, आयकर, गृह-वाहन कर्ज, केवायसी अशा विविध मुद्द्यांवर सरकारची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. तसेच मंदीतून सावरण्यासाठी सरकार कोणती पावले उचलत आहे,त्याबाबत माहिती दिली. पत्रकार परिषदेत अर्थव्यवस्थेवर एक सादरीकरण करून 32 स्लाइड्समधून सीतारामन यांनी अर्थव्यवस्थेची सध्याची स्थिती स्पष्ट केली.

चीन आणि अमेरिकेसह अन्य अनेक देशांच्या तुलनेत आपला जीडीपी वृद्धीदर चांगला आहे. अर्थव्यवस्थेशी संबंधित अडचणींवर मात करण्यासाठी आम्ही पावले उचलत आहोत. आपला विकासदर ट्रॅकवर आहे. आर्थिक सुधारणांवर आमचा भर आहे. उद्योगधंद्यांना मंजुरी देण्याची प्रक्रिया आम्ही अधिक सुलभ केली आहे, असे सीतारामन यांनी सांगितले. जीएसटीची प्रक्रिया येत्या काही दिवसांमध्ये अधिक सुलभ केली जाणार आहे असंही निर्मला सीतारामन यांनी स्पष्ट केले. देशात व्यवहार करणे आता सोपे झाले आहे. आर्थिक सुधारणेची प्रक्रिया ऑटोमॅटिक झाली आहे असेही त्यांनी सांगितले. अर्थव्यवस्था सुधारण्याचे काम वेगाने सुरु आहे. अर्थव्यवस्थेतील सुधारणेला सरकारचे प्राधान्य असल्याचेही त्यांनी सांगितले. कॅपिटल गेन्सवरचा सरचार्ज मागे घेण्यात आल्याचेही त्यांनी जाहीर केले. या निर्णयामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांचा उत्साह वाढेल असा विश्वासगी त्यांनी व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या