हिंदुस्थानच्या इलावेनिलचा ‘सुवर्ण’वेध

ऑलिम्पिक पदकविजेत्या हिंदुस्थानच्या इलावेनिल वालारिवनने आयएसएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्णपदक पटकावले. फ्रान्सच्या ओसिएने मुलरला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर चीनच्या झांग जियालेने कांस्यपदकाची कमाई केली.

इलावेनिल वालारिवनने 252.2 गुणांची कमाई करीत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. त्याने अंतिम फेरीतील 24 शॉटमध्ये एकही शॉट 10.1 च्या कमी मारला नाही हे विशेष. फ्रान्सच्या 20 वर्षीय ओसिएने मुलरला 7 च्या पिछाडीमुळे सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. त्याने 251.9 गुणांसह रौप्यपदक जिंकले. चीनच्या झेंग जियालने तिसरे स्थान मिळवून कांस्यपदक जिंकले.

इलावेनिलने 630.5 गुणांसह अंतिम फेरीत प्रवेश केला होता. ओसिएने मुलरने पात्रता फेरीत 633.7 गुणांसह अव्वल स्थान पटकावले होते. चीनच्या झेंग जियाली आणि झेंग यू या दोन नेमबाजांशिवाय नॉर्वेची युरोपियन चॅम्पियन जेनेट हेग डुएस्टेडनेही अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

मिश्र दुहेरीत हिंदुस्थानला पदकाची हुलकावणी

इलावेनिलने 314.8, तर संदीपने 314.3 गुणांची कमाई केली, मात्र हिंदुस्थानी जोडीला थोड्या फरकाने कांस्यपदकाने हुलकावणी दिली. शेवटी इस्रायलने कांस्यपदक जिंकले. जर्मनीने सुवर्णपदक, तर हंगेरीने रौप्यपदकाला गवसणी घातली.