देशातील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक दुचाकी लॉन्च, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत…

देशांतर्गत बाजारामध्ये इलेक्ट्रिक वाहनांना मागणी वाढत आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे आणि प्रदुषणाच्या समस्येमुळे तरुण पिढी इलेक्ट्रिक गाड्यांना पसंती देत आहे. याच तरुण पिढीला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी Kabira Mobility ने आपली हाय स्पीड इलेक्ट्रिक दुचाकी लॉन्च केली आहे.

Kabira Mobility च्या या नव्या इलेक्ट्रिक दुचाकी मॉडेलचे नाव KM3000 आणि KM4000 आहे. यातील KM4000 ही दुचाकी हिंदुस्थानमधील सर्वात वेगवान इलेक्ट्रिक दुचाकी असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

kabira-mobility

पॉवर आणि चार्जिग

KM3000 आणि KM4000 या दोन्ही गाड्या 2 तास 50 मिनिटांमध्ये जवळपास 80 टक्के चार्ज होतात असा दावा कंपनीने केला आहे. तसेच बुस्ट चार्जच्या सहाय्याने अवघ्या 50 मिनिटात या दोन्ही गाड्या चार्ज होतात. तर इको चार्ज मोडमध्ये गाड्या फुल चार्ज होण्यासाठी 6 तास 30 मिनिटांचा वेळ लागतो, अशी माहिती कंपनीने दिली आहे.

kabira-mobility-2

किंमत

– कंपनीने KM3000 ही दुचाकी 1 लाख 26 हजार 990 रुपयांच्या प्राईज टॅगसह लॉन्च केली आहे. यात 4kWh बॅटरीचा वापर करण्यात आला असून सोबतच BLDC (ब्रशलेस DC इलेक्ट्रिक मोटार) देण्यात आली आहे. इको मोडमध्ये 120 किलोमीटर करत स्पोर्टस मोडमध्ये 60 किलोमीटरची रेंज या दुचाकीसह देण्यात आली आहे.

kabira-mobility-1

– कंपनीने KM4000 ही दुचाकी 1 लाख 36 हजार 990 रुपयांच्या प्राईज टॅगसह लॉन्च केली आहे. या इलेक्ट्रिक दुचाकीमध्ये 4.4kWh ची बॅटरी आणि 8kW ची मोटार देण्यात आली आहे. इको मोडमध्ये ही दुचाकी 150 किलोमीटरचा पल्ला पार करते. या दुचाकीचा सर्वोच्च वेग 120 किलोमीटर प्रति तास असून स्पोर्टस् मोडमध्ये ही दुचाकी 90 किलोमीटरपर्यंत पल्ला गाठते.

आपली प्रतिक्रिया द्या