देशातील पहिला मतदार वयाच्या शंभरीत बजावणार मतदानाचा हक्क!

124

सामना ऑनलाईन । सिमला

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावलेले शाम शरण नेगी वयाच्या शंभरीत यंदाही हिमाचल प्रदेशच्या ९ नोव्हेंबरला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. गेली ६६ वर्षे नेगी मतदान करत आहेत. वार्धक्य आणि प्रकृतीच्या तक्रारीमुळे त्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहचण्यासाठी प्रशासनाने वाहनाची व्यवस्था केली आहे.

देशातील या पहिल्या मतदाराचे लाल पायघडय़ा घालून मतदान केंद्रात स्वागत करण्यात येणार आहे. २५ ऑक्टोबर १९५१ मध्ये किन्नोर येथे मतदान झाले होते. तेव्हा नेगी यांची देशातील पहिला मतदार म्हणून नोंद करण्यात आली होती.

आपली प्रतिक्रिया द्या