बहिणीच्या आधारकार्डवर गर्ल फ्रेंड, इंडीगो कर्मचाऱ्याचा प्रताप

1799
indigo

बहिणीच्या आधारकार्डवर गर्ल फ्रेंडचा फोटो चिकटवून तिच्याबरोबर फुकटात विमानातून सैर करणे एका इंडीगो कर्मचाऱ्याला चांगलच महागात पडलं आहे. कोच्ची विमानतळावर या दोघांना अटक करण्यात आली आहे.

ही घटना 26 ऑक्टोबरला घडली आहे. राकेश व्यास नावाचा हा कर्मचारी भुवनेश्वर विमानतळावर काम करतो. 26 ऑक्टोबरला कोच्ची विमानतळावर प्रवांशांची तपासणी करत असता सीआयएसएफच्या एका कर्मचाऱ्याला तेवीस वर्षीय तरुणीचे आधार कार्ड बघून संशय आला. सीसीटीव्हीमध्ये संबंधित तरुणी विमानतळावर राकेशबरोबर आल्याचे दिसत होते. त्यामुळे सीआयएसएफने राकेशला बोलावले. त्यानंतर दोघांची चौकशी करण्यात आली. त्यावेळी बहिणीच्या आधारकार्डवर गर्ल फ्रेंडचा फोटो चिकटवल्याचे राकेशने कबुल केले. तसेच गर्ल फ्रेंडला फुकटात विमान प्रवास करता यावा यासाठी हे कृत्य केल्याची कबुलीही राकेशने दिली. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या