
आसाममधील गुवाहाटी येथे इंडिगो विमानाचे (IndiGo flight) इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. हे विमान दिब्रुगडला निघाले होते. मात्र इंजिनमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाल्याने या विमानाचे गुवाहाटीतील लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Lokpriya Gopinath Bordoloi International Airport) इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. हा सर्व प्रकार घडला तेव्हा विमानामध्ये केंद्रीय मंत्र्यांसह भाजपचे दोन आमदारही प्रवास करत होते.
इंडिगोच्या 6E22652 या विमानाने दिब्रुगडला जाण्यासाठी उड्डाण घेतले होते. मात्र विमान हवेत असतानाच पायलटने इंजिनमध्ये तांत्रिक समस्या निर्माण झाल्याची घोषणा केली. यानंतर हे विमान गुवाहाटी येथील लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळवण्यात आले आणि सुरक्षित लँडिंगही करण्यात आले.
गुवाहाटीकडे वळवण्यापूर्वी हे विमान दिब्रुगड विमानतळावर 15 ते 20 मिनिटे हवेत घिरट्या घालत होते. त्यानंतर ते लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे वळवण्यात आले. या विमानातून केंद्रीय राज्यमंत्री रामेश्वर तेली (Rameshwar Teli, Union Minister of State for Petroleum and Natural Gas) यांच्यासह भाजपचे दोन आमदार प्रशांत फुकन (Prashant Phukan) आणि तेराश गोवाला (Terash Gowala) हे प्रवास करत होते. मात्र अचानक पायलटने इंजिनमध्ये घोषणा केल्याने त्यांच्यासह 150 प्रवाशांचा जीव टांगणीला लागला होता.
A Dibrugarh-bound IndiGo flight was diverted to Guwahati’s Lokpriya Gopinath Bordoloi International after the pilot of the plane announced snag in engine of the aircraft. Over 150 passengers were travelling on the flight, including Union Minister of State for Petroleum and… pic.twitter.com/umZb0sm75V
— ANI (@ANI) June 4, 2023
या घटनेबाबत बोलताना केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली म्हणाले, भाजप आमदार प्रशांत फुकन आणि तेराश गोवाला यांच्यासोबत मी इंडिगो विमानामध्ये होतो. गुवाहाटीकडे वळवण्यापूर्वी दिब्रुगड विमानतळावर विमान 15 ते 20 मिनिटे हवेतच घिरट्या घालत होते. आम्ही सर्व सुरक्षित आहोत.
I was on the Indigo flight along with BJP MLAs Prashant Phukan and Terash Gowala. The flight was in the air for 15 to 20 minutes before being diverted to Dibrugarh Airport in Guwahati. We are all safe: Rameshwar Teli, Union Minister of State for Petroleum and Natural Gas
— ANI (@ANI) June 4, 2023