ऐन हवेतच इंडिगो विमानाचे इंजिन फेल, प्रवाशांचा जीव टांगणीला

उड्डाण घेताच इंडिगो विमानाचे इंजिन फेल झाले होते. त्यामुळे कोलकाता विमानतळावर या विमानाचे इमर्जन्सी लॅण्डिग करण्यात आले. विमानाचे इंजिन फेल झाल्यामुळे प्रवाशांचा जीव टांगणीलाच लागला होता.

कोलकाता विमानतळावरून 6E 0573 हे विमान रात्री निघाले. तेव्हा विमानाचे प्रवासी निलंजन दास यांना विमानातून विचित्र आवाज आले. त्यांनी खिडकीबाहेर पाहिले तर इंजिनमधून आगीच्या ज्वाळा बाहेर पडत होत्या. तेव्हा दास यानी तत्काळ विमान प्रशासनाला याची माहिती दिली. विमान प्रशासनाने तपास केला तेव्हा विमानाचे इंजिन फेल झाल्याचे कळाले. तेव्हा तातडीने विमानात इमरजन्सी घोषित करण्यात आली. ऐन हवेतच विमानाचे इंजिन फेल झाल्याने सर्व प्रवाशांचा जीव टांगणीला लागला. रात्री 10.39 वाजता विमानात इमर्जन्सी घोषित करण्यात आली. आणि विमान 11.05 वाजता पुन्हा कोलकाता विमानतळावर लॅण्ड करण्यात आलं. त्यानंतर सर्व प्रवाशांना बाहेर काढून विमान दुरुस्त करण्यात आलं. या विमानातील सर्व 173 प्रवासी सुखरूप आहेत अशी माहिती विमानतळ प्रशासनाने दिली आहे.