इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन: सिंधूची उपांत्य फेरीत धडक

88

सामना प्रतिनिधी । हैदराबाद

हिंदुस्थानची शटलक्वीन पी. व्ही. सिंधू हिने इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत दमदार कामगिरी शुक्रवारीही सुरूच ठेवली. पी. व्ही. सिंधूने उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत नोझोमी ओकुहरा या खेळाडूला 21-14, 21-7 असे सहज हरवले आणि अगदी दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला. आता अंतिम फेरीत सिंधूसमोर चीनच्या चेन फेईचे आव्हान असणार आहे.

पाचवी सीडेड सिंधू हिने माजी जगज्जेती नोझोमी ओकुहरा हिला अवघ्या 44 मिनिटांमध्ये पराभूत केले. या विजयानंतर सिंधू म्हणाली, आजच्या माझ्या खेळावर आनंदी आहे. आता उद्याच्या लढतीवर लक्ष केंद्रित केले आहे. प्रतिस्पर्धी आक्रमक खेळ करणारी असल्यामुळे मला पुन्हा एकदा सर्वोत्तम खेळ करावा लागणार आहे. या स्पर्धेचे जेतेपद पटकावण्यासाठी सर्वस्व पणाला लावीन.

रशियन ओपनमध्ये हिंदुस्थानी चमकले

रशियन ओपन स्पर्धेत हिंदुस्थानी खेळाडू चमकले आहेत. ध्रुव कपीला व मेघना जे. यांनी मिश्र दुहेरीत आणि पूर्वीशा राम व मेघना जे. यांनी महिला दुहेरीत उपांत्य फेरीत धडक मारत आपली चुणूक दाखवली.

आपली प्रतिक्रिया द्या