बालकांचा वापर ढालीसारखा करा,इंद्राणीने दिला महिला कैद्यांना सल्ला

13

सामना ऑनलाईन, मुंबई

पोटच्या मुलीचा म्हणजेच शीना बोराचा खून करणाऱ्या इंद्राणी मुखर्जीवर भायखळ्यातील तुरूंगात महिला कैद्यांना भडकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. इंद्राणीने या महिला कैद्यांना त्यांच्या बालकांचा वापर पोलिसांपासून बचावासाठी ढालीसारखा वापर करण्याचा सल्ला दिला होता असं सांगण्यात येत आहे.

मंजूदीदी म्हणजे मंजुळा शेट्ये या महिला कैद्याचा तुरूंगात मृत्यू झाला, यानंतर महिला कैदी आणि आरोपींनी तुरूंग प्रशासनाविरूद्ध आणि अधिकाऱ्यांविरोधात आंदोलन केलं. या आंदोलन करणाऱ्या महिला  तुरूंगाच्या गच्चीपर्यंत पोहोचल्या होत्या. या महिलांविरूद्ध पोलीस बळाचा वापर करणार हे सगळ्यांना ठाऊक होतं. त्यापासून वाचण्यासाठी महिलांनी त्यांच्या मुलाबाळांना ढालीसारखं समोर उभं करावं असा सल्ला इंद्राणी मुखर्जीने दिला होता.

 

आपली प्रतिक्रिया द्या