इंद्रप्रस्थ ते दिल्ली…कसा झाला प्रवास…वाचा सविस्तर

729

अलाहबाद शहराचे नाव बदलून प्रयागराज करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे देशातील काही शहरांची नावे बदलण्याची चर्चा होत आहे. देशाची राजधानी असलेल्या शहराला दिल्ली हे नाव कसे मिळाले, याबाबतच्या अनेक रंजक कथा प्रचलीत आहेत. राजधानी दिल्लीच्या नावाचा उल्लेख प्रथम पौराणिक काळात आढळतो.  पांडवांनी इंद्रप्रस्थ या नावाने आपली राजधानी याच शहरातच वसविली होती. तेव्हापासून हे शहर इंद्रप्रस्थ नावाने ओळखले जाऊ लागले. इंद्रप्रस्थपासून  दिल्लीपर्यंतच्या नावाचा या शहराचा प्रवास कसा झाला याबाबत अनेक रंजक गोष्टी सांगितल्या जातात.3महाभारत काळानंतर ईसवीसन पूर्व 50 मध्ये या शहराचा उल्लेख आढळतो .त्या काळात मौर्य वंशांतील धिल्लु हा राजा होता. त्याला दिलू म्हणूनही ओळखले जाते. त्याच्या नावावरून या शहराला दिल्ली नाव पडल्याचा एक मतप्रवाह आहे. तर दिलू या नावाचा अपभ्रंश होउन नंतर या शहराचे नाव दिल्ली असे झाले असेही सांगण्यात येते. त्याचप्रमाने दिलूच्या सिंहासनासमोर एक खिळा होता. हा खिळा पाताळापर्यंत पोहोचला आहे, अशी मान्यता होती. हा खिळा मजबूत असेपर्यंत मौर्य साम्राज्य राहील असे भाकीत वर्तवण्यात आले होते. त्यामुळे हा खिळा आणखी मजबूत करावा, यासाठी दिलूने तो काढून टाकला. मात्र, पुन्हा तो बसवताना पूर्वीइतका मजबूत बसला नाही, तो ढिला झाला. त्या ढिलावरूनही या शहराला दिल्ली नाव पडल्याचे सांगण्यात येते.90दिल्ली या नावाच संबंध तोमरवंशाशीही जोडण्यात येतो. तोमरवंशचा राजा धव याने या शहराचे नाव ढीली ठेवण्यामागे एक मजेशीर कथा सांगण्यात येते. तो राहत असलेल्या  गडात एक लोखंडी खांब होता. मात्र, तो खांबा खूप डळमळीत होता. त्याला ढिला खांब म्हटले जात होते. ढिला खांब ज्या शहरात आहे, ते शहर म्हणजे दिल्ली अशी कथा याबाबत सांगण्यात येते. तोमर साम्राज्याच्या काळात वापरण्यात येणाऱ्या शिक्क्यांना देहलीवाल म्हटले जायचे. त्या शिक्क्यांवरून या शहराला दिल्ली  नाव मिळाल्याचे काही संशोधक सांगतात. दिल्ली ही आपल्या देशाची सीमा होती. सीमेला हिंदी भाषेत दहलीज असे म्हणतात. दहलीजवरून या शहराला दिल्ली अशी ओळख मिळाल्याचेही काही संशोधकांचे मत आहे. या साम्राज्यांच्या काळानंतर पृथ्वीराज चौहान यांचा राजकवी असलेल्या चंदरबरदाई यांच्या साहीत्यातही दिल्ली या नावाचा उल्लेख आढळतो. त्यांच्या मते तोमरवंशाचा राजा अंनतपालन हा  दिल्लीचे संस्थापक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या