आंदोलनं, मोर्चे नको; इंदुरीकर महाराजांचं चाहत्यांना शांततेचं आवाहन

1393
nivrutti-indurikar-1

मुलगा-मुलगीच्या जन्माबाबत वक्तव्य केल्यामुळे वादात अडकलेले लोकप्रिय कीर्तनकार निवृत्तीमहाराज इंदुरीकर यांच्या समर्थनार्थ आता लोक पुढे येऊ लागले आहेत. त्यांच्यासाठी आंदोलनं करण्याची चाहत्यांची तयारी सुरू आहे. मात्र, खुद्द इंदुरीकर महाराजांनी चाहत्यांना त्यापासून रोखलं आहे. आपल्यासाठी कुणीही मोर्चे, आंदोलनं करू नये, असं आवाहन त्यांनी पत्रकाद्वारे केलं आहे.

इंदुरीकर महाराजांनी एक पत्रक जाहीर केलं आहे. त्या पत्रकानुसार, ‘आपण कोणीही, कुठेही मोर्चा, रॅली, एकत्र जमणे, निवेदन देण्याचा प्रयत्न करू नये, असं आवाहन त्यांनी समर्थकांना केलं आहे. ‘चलो नगर’ म्हणून सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल होत आहे. आपण सगळी माझ्यावर प्रेम करणारी भक्त मंडळी आहात. वारकरी संप्रदाय शांतताप्रिय आहे. त्यामुळं आपण कोणीही, कुठेही मोर्चा, रॅली, एकत्र जमणे, निवेदन देणे असे काहीही करण्याचा प्रयत्न करू नये. अशामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आपण आपली बाजू कायदेशीररित्या शांततेच्या मार्गाने मांडणार आहोत. तरी सर्वानी शांतता राखून सहकार्य करावं,’ अशी विनंती त्यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या