हिंदुस्थानी क्रिकेटपटू विक्रमांच्या उंबरठ्यावर

13

सामना ऑनलाईन । मुंबई

श्रीलंकेची धुलाई करुन मायदेशी परतलेल्या कोहली ब्रिगेडचा सामना आता ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. घरच्या मैदानात खेळायचे असले तरी हिंदुस्थानपुढे कांगारुंचे तगडे आव्हान आहे. या आव्हानाला सामोरे जात असलेले हिंदुस्थानी क्रिकेटपटू विक्रमांच्या उंबरठ्यावर आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सरस कामगिरी करुन एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०० बळी (विकेट) घेण्याची संधी उमेश यादव आणि मोहम्मद शमी या दोन वेगवान गोलंदाजांकडे आहे.

उमेश यादवने आतापर्यंत ७० एकदिवसीय सामन्यांत ९८ बळी घेतले आहेत. त्याला १००चा टप्पा ओलांडण्यासाठी २ बळींची आवश्यकता आहे. शमीने आतापर्यंत ४९ सामन्यांमध्ये ९१ बळी घेतले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत ९ बळी मिळवून १००चा टप्पा ओलांडण्याची संधी त्याच्याकडे आहे.

उमेश यादवच्या खेळात सातत्याने सुधारणा होत आहे. कसोटी सामन्यांतही तो संघासाठी आधारस्तंभ झाला आहे. एका एकदिवसीय सामन्यात ३१ धावांत ४ बळी ही उमेशची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. तर एका एकदिवसीय सामन्यात ३५ धावा देऊन ४ बळी ही शमीची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या