
आयसीसी महिला विश्वचषकाचा अंतिम सामना यजमान हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये रंगणार आहे. रविवारी दुपारी तीन वाजल्यापासून नवी मुंबईच्या डीवाय पाटील मैदानावर हा सामना सुरू होईल. सामना सुरु होण्यापूर्वीच पावसाने हजेरी लावली आहे. मात्र तरीही क्रीडाप्रेमींमधील उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नवी मुंबईत क्रीडाप्रेमींनी मोठी गर्दी केली असून वेगवेगळ्या पद्धतीने खेळाडूंना चिअर करण्यासाठी लहानग्यांपासून ज्येष्ठांनी उपस्थिती लावली आहे.
फोटो – गणेश पुराणिक































































