मध्यान्ह भोजनाच्या गरम डाळीच्या टोपात पडून बालकाचा मृत्यू

28

सामना ऑनलाईन । पाटणा

बिहारमधील खुसुरपूर गावात एका सरकारी शाळेत चार वर्षाच्या बालकाचा मध्यान्ह भोजनाच्या गरम डाळीच्या टोपात पडून मृत्यू झाला आहे. दिलखुश चौधरी असे त्या बालकाचे नाव असून त्याची आज्जी या शाळेत मध्यान्ह भोजन बनविण्याचे काम करते.

गुरुवारी दिलखुश त्याची आज्जी शिला देवी सोबत शाळेत आला होता. त्यावेळी खेळता खेळता तो जेवण बनत असलेल्या खोलीत आला. तेथे मस्ती करत असताना त्याचा तोल गेला व तो डाळीच्या टोपात पडला. डाळ नुकतीच गॅसवरुन उतरवलेली असल्याने फार गरम होती. या दुर्घटनेत दिलखुश गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला खुसुरपुर मधील स्थानिक रुग्णालयात दाखल केले मात्र तेथे शुक्रवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. असे खुसुरपुर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी मृत्यूंजय कुमार यांनी सांगितले. या प्रकरणी जिल्हा शिक्षण अधिकारी ज्योती कुमारी यांनी शाळेला नोटीस बजावून या दुर्घटनेबाबत स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे.

दिलखुश हा त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याचे वडील गुड्डू चौधरी याला दोन वर्षांपूर्वी मुंबई पोलिसांनी चोरी केल्याप्रकरणी अटक केली होती. तर त्याची आई पिंकू चौधरी व आज्जी घरकाम व जेवण बनविण्याची कामे करुन उदरनिर्वाह करतात.

आपली प्रतिक्रिया द्या