अखेर ‘त्या’ अल्पवयीन मातेला संभाजीनगर पोलिसांनी 18 तासाच्या आत घेतले ताब्यात

731

परळीत सोमवारी, 24 फेब्रुवारी रोजी रात्री एक स्त्री जातीचे नवजात अर्भक काट्याकुट्यात आढळून आले होते. या प्रकरणी रात्री संभाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी तपासाचे चक्र वेगाने फिरवले असून अवघ्या 18 तासाच्या आत चिमुरडीच्या मातेला ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डी. बी. पथकाचे प्रमुख रमेश सिरसाट यांच्या नेतृत्वाखाली सहकाऱ्यांनी प्रयत्नांची शर्थ करत 18 तासांत 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पुढील पोलीस कारवाई सुरू आहे. या संवेदनशील प्रकरणी संभाजीनगर डी. बी.दत्तात्रय गित्ते, सचिन सानप आदी कर्मचाऱ्यांनी पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवारांच्या मार्गदर्शनाखाली खाकीतील माणसाचे स्तुत्य दर्शन घडवले. त्यामुळे सर्वांचे कौतुक होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या