अंडी खाणाऱ्यांनी जरूर वाचा!

808
सामना ऑनलाईन । मुंबई

एक ऑम्लेट द्या, एक हाफ- फ्राय द्या, अशा ऑर्डर तुम्ही रोज सोडत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी फायदेशीर आहे. कारण अंडी खाणे हे आरोग्यासाठी चांगले असले तरी ते कसे खावे, अंड्याचे पदार्थ खाताना काय काळजी घ्यावी याची माहिती असणं आवश्यक आहे, अन्यथा अंडी तुमच्या अंगी लागण्याऐवजी अंगाशी आल्यासारखं होण्याची शक्यता आहे. ‘संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे’ हा संदेश अगदी तंतोतंत पाळणारे अनेकजण आहेत. त्यांच्यासाठीच या खास टीप्स…

* अंड खाताना एकतर ते पूर्ण शिजलेले असावे किंवा पूर्ण कच्चे असावे. अर्ध कच्चे किवा अर्ध शिजलेले अंड तुम्हाला त्रासदायक ठरू शकते. अर्ध शिजलेली अंडी खाल्लाने पोटाच्या समस्या, उलटी होणे, शरिराला सूज येणे किंवा अस्वस्थ वाटणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

* जर तुम्हाला हाय ब्लड-प्रेशर किंवा डायबिटीसचा त्रास असेल तर अंड्यातील फक्त सफेद भाग खावा. अंड्यातील पिवळा भाग (बलक) खाणे हानिकारक ठरू शकते.

* ह्रदयरोगाचा त्रास असणाऱ्या व्यक्तिंनीही अंड्यातील बलक खाणं टाळावं. त्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये चरबी वाढून शारीरिक समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.

* एका संशोधनानुसार अंड्याचे अधिक सेवन केल्याने प्रोस्टेट कॅन्सर होण्याची शक्यता असते. त्यामुळे अंडी खाताना या सर्व गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या