शेअर इट भाग १०- शेअर बाजारातील गुंतवणुकीसाठी खास टिप्स

148
mumbai share market

mahesh-chavan-th>>महेश चव्हाण (अर्थ नियोजन सल्लागार आणि शेअर्स मार्केट तज्ज्ञ)

Suprajit Engineering Ltd :- सुप्रजीत इंजिनिअरिंग

सध्याची किंमत :- २७४.०० रुपये

१८९५ मध्ये हि कंपनी स्थापन झाली, मोटारी व बाईक साठी लागणाऱ्या केबाल बनवणे हा या कंपनीचा व्यवसाय .
दरवर्षी १५ दशलक्ष केबल्सची क्षमता असलेली ऑटोमेटिव्ह केबल्सची भारतातील सर्वात मोठी उत्पादक म्हणून ओळख निर्माण केली आहे, तर जगात केबल उत्पादन व्यवसाय करणाऱ्यामधे पहिल्या ५ कंपन्या मध्ये या कंपनीचे नाव घेतले जाते. ऑटोमोबाईल सेक्टर खूप वेगाने संपूर्ण जगात तसेच भारतात वाढत आहे, हे पाहिल्यास या कंपनी चा हि विस्तार वाढण्यास खूप वाव आहे.

भविष्यातील अंदाजित किंमत :- ३४०.०० रुपये
Interglobal Aviation – ईंटरग्लोबल एविअशन

सध्याची किंमत :- १२४५.०० रुपये

भारतातील सर्वात तरुण व जलद वाढणाररी एअरलाइन इंडिगो हि कंपनी म्हणजेच ईंटरग्लोबल एविअशन कंपनी. ही कंपनी विमानसेवा सेवा पुरवणे, तसेच विमान व्यवस्थापन, आयटी आणि बीपीएम सेवा, प्रगत वैमानिक प्रशिक्षण आणि विमानाची देखभाल इत्यादी चे काम करते. जगभरातील ६० शहरांमध्ये यांची १२६ पेक्षा जास्त ऑफिस आहेत. ६ इंटरनॅशन व भारताततील जवळपास ४१ शरांमध्ये वाजवी दरात विमानसेवा पुरवण्याचे काम करते. हि कंपनी लॉन्ग टर्म मध्ये चांगल्या संध्यांचा फायदा घेत मोठी कामगिरी करेल हे नक्कीच.

भविष्यातील अंदाजित किंमत :- १५४५.०० रुपये
TCS -टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड

सध्याची किंमत :-२८०९.०० रुपये

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (टीसीएस) एक भारतीय बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान (आयटी) सेवा, सल्लागार व व्यवसाय सोल्यूशन्स कंपनी असून मुख्यालय मुंबईमध्ये आहे. ही टाटा समूहाची उपकंपनी आहे आणि ४६ देशांमध्ये काम करते.टीसीएस ही बाजार भांडवलाची सर्वात मोठी भारतीय कंपनी आहे. टीसीएस आता जगभरातील सर्वात मूल्यवान आयटी सेवा ब्रँड म्हणून ओळखला जातो. आताचे युग हे तंत्रज्ञान युग संबोधले जाते, हे पाहता भविष्यातही हि या कंपनीचा विस्तार वाढतच राहील.

भविष्यातील अंदाजित किंमत :- ३१००.०० रुपये

आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. ई-मेल आयडी: [email protected]

टीप- शेअर बाजारात गुंतवणूक हा जोखमीचा विषय आहे. लेखातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाव्यतिरिक्त स्वत: खात्री केल्याशिवाय गुंतवणूक करु नये, गुंतवणुकीत तोटा सहन करावा लागल्यास आम्ही जबाबदार नाही.

आपली प्रतिक्रिया द्या