इन्फोसिसच्या कर्मचाऱ्याची आठव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या

26

सामना प्रतिनिधी । पुणे

पुण्यातील प्रतिष्ठीत अशा इन्फोसिस कंपनीत काम करणाऱ्या एका २४ वर्षाच्या तरुणाने आत्महत्या केली आहे. रहाटणी येथील घराच्या आठव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या केली आहे. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारात ही घटना घडली आहे. निनाद देशभूषण पाटील असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. इम्फोसिस कंपनीत तो आयटी सेक्टरमध्ये कार्यरत होता.

निनादने आठव्या मजल्यावरून उडी घेतल्यानंतर त्याला तातडीने पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.निनाद याने आत्महत्येपुर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हंटले आहे की, मी स्वःइच्छेने आत्महत्या करीत असून यामध्ये माझ्या आई-वडिलांना दोषी धरू नये. मात्र त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकलेले नाही. प्राथमिक अंदाजावरुन ही आत्महत्या नैराश्यातून केली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या