ऑस्ट्रेलिया संघाला झटका, मिशेल मार्श पाठोपाठ स्टार्क कसोटी मालिकेतून बाहेर

15

सामना ऑनलाईन । बेंगळुरू

हिंदुस्थान विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर ऑस्ट्रेलियाला आणखी एक धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा जलद गोलंदाज मिशेल स्टार्क पुन्हा मायदेशी परतणार आहे. उजव्या पायाला फ्रॅक्चर झाल्याने त्याला मालिका अर्धवट सोडून ऑस्ट्रेलियाला जावे लागणार आहे.

मिशेल स्टार्कला दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान उजव्या पायाला दुखत असल्याचे जाणवत होते. त्यानंतर उपचारादरम्यान केलेल्या चाचण्यांमध्ये पाय फ्रॅक्टर झाल्याचे निष्पन्न झाले.

याआधीत मिशेल मार्श खांद्याच्या दुखापतीमुळे संघातून बाहेर पडला आहे. त्यामुळे मिशेल मार्शनंतर स्टार्कही संघाबाहेर गेल्यानं ऑस्ट्रेलिया संघ मोठ्या अडचणीत सापडला आहे. स्टार्कच्या जागी मार्कस स्टोईनिसला बोलवण्यात आले आहे.

स्पिनर्ससाठी अनुकूल असलेल्या पिचवर मिशेल स्टार्कने २ कसोटी सामन्यात ५ विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे आता स्टार्कच्या जागी संघात कोणाला घ्यायचे असा प्रश्न ऑस्ट्रेलिया संघाच्या निवड समितीसमोर निर्माण झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या