भीमा-कोरेगाव प्रकरणी चौकशीचे आदेश

सामना ऑनलाईन । मुंबई

भीमा कोरेगावात जी काही घटना घडली आहे त्याची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. चौकशीअंती दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई होईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. चौकशीसाठी विद्यमान न्यायाधीशांची नियुक्ती व्हावी यासाठी आम्ही उच्च न्यायालयात जाणार आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. चौकशीसाठी सीसीटीव्ही फूटेजची मदत घेतली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. सर्वांनी कायद्याचे पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

याआधी मुंबईतील किरकोळ व्यापाऱ्यांच्या संघटनेने मंगळवारी आणि बुधवारी झालेल्या हिंसक घटनांमुळे किमान ७०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. सोमवारी भीमा कोरेगावात घडलेल्या घटनेबाबतची काही वृत्त प्रसिद्ध झाली. मंगळवारी मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी संबंधित वृत्तामुळे तणाव निर्माण झाला, हिंसक घटना घडल्या. बुधवारी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला. बंदच्या काळात मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचार झाला. खासगी आणि सार्वजनिक संपत्तीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या